घाटकुळ येथील इसमाचा वीज पडून मृत्यू.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथील विजय हनुमंतू धंदरे (वय 46) हे शेळ्या राखण्यास गेले असता काल सायंकाळी (दि. २ मे ) 4 वाजताच्या सुमारास वीज पडून मृत्यू झाला. सायंकाळ होऊनही मृतक घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली असता, त्यांच्या शेतातील बांधावरच पडून असल्याचे निदर्शनास आले.


हघरचे एकमेव कमावते व्यक्ती मरण पावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे. घटनास्थळी पोलिस दाखल होऊन पंचनामा केला. शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत