जिओ मोबाईल टॉवर मधील डीझल चोरी करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी उधळून लावला.

Bhairav Diwase
चिमूर येथील आरोपीला गावकऱ्यांनी पकडले रंगेहात.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- शनिवार दि. 15/05/2021 ला रात्रौ 11 वाजताच्या सुमारास उमरवाही या गावामधील दोन युवकांनी जिओ टॉवर मधील डिझेल चोरी करण्यासाठी आले होते. गावकऱ्यांच्या सतर्कतेने डिझेल चोरीचा प्रयत्न करताना एकाला रंगेहात पकडण्यात आले. तर एक जण तिथून पळ काढला.
त्यावेळी दोन युवकांनी आरडाओरडा केल्यानंतर समस्त गावातील लोक तिथे जमा झाले. नंतर त्यांची गावातील लोकांनी कसून चौकशी केल्यावर त्या आरोपीने आम्ही दोघे मिळून डिझेल चोरी करायला आलो व माझा साथीदार इथून पळून गेल्याचे सांगितले.
डीझल चोरी करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी हा रा. पळसगाव (पिपर्डा) ता. चिमूर येथील असून या आरोपीला उमरवाही गावातील पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशन नवरगाव पोलीसांच्या स्वाधीन केले.
नवरगाव पोलीस ने डिझेल चोरी प्रकरणातील आरोपी वर अप. क्रमांक 197 /2021 अंतर्गत कलम 379, 511 नुसार दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.