विकासकामात डावलले!
-प्रा.महेश पानसे
**********************
विदर्भ अध्यक्ष, राज्य पत्रकार संघ
(भाग्--१)
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मूल:- मुल शहराचा चेहरा बदलविण्याची किमया तत्कालिन अर्थ मंत्री व विद्यमान आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यानी केली. हे जरी खरे असले तरी मात्र न.प. प्रशाशनाचे महत्व व अधिकार सार्वजनीक बांधकाम विभागाचे दावनीला बांधून लोकनियुक्त नगरसेवकाच्या अधिकारावर गदा तर या निमित्ताने आणून ठवली तर नाही ना? हे सवाल उपस्थित झाला आहे. मुल नगरपरिषदेच्या प्रशासनातील बाहुमतात असलेल्या भाजपतील बहुतांस नगरसेवक वॉर्डात, प्रभागात जनमतानुसार बांधकामे होत नसल्याने हतबल व निराश असल्याचे स्पष्टपणें जाणवू लागले आहे.
अर्थमंत्री असतांना आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मुल शहराच्या विकासासाठी अतोनात पैसा उपलब्ध करून दिला. (काही जानकार नाहक खर्चे सुद्धा लय झाला म्हणतात) .
यातील अन्दाज़े १८ ते २० करोड रुपये शहरामधील अंतर्गत रस्त्याचे खद्दीकरन, कॉंक्रिटीकरण, गटारे (पाईप लाईन) याकरिता मंजूर करण्यात आले.
संपूर्ण कामाची ड्रॉईंग, अन्दाज़पत्रके तयार करुन न.प. ने हमाली केली मात्र या करोडोचे कामाचे बांधकामाची अधिकार बहाली सार्वजनीक बांधकाम विभागास करण्यात आली.
का करण्यात आली हे जगजाहीर असले तरी मुल शहराची भौगोलीक व वॉर्डातील गुंतागुंतीची अवस्था बघता प्रत्यक्ष कामे करतांना लोकनियुक्त प्रतीनिधीचे मत फार महत्वाचे ठरते.
सा. बा. विभागाने कामे करताना नगर सेवकाना कचरा झाडल्यागत झाडले व फंड खर्चाचे नादात ठेकेदारास बिग बॉस बनवून की काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहराची नगररचना व जुने वॉर्ड प्लॅनिंग नुसार नाहीत,पर्यायाने बांधकामात बरेच बदल अपेक्षित आहेत. यासाठी स्थानीक नगरसेवकाना सोबत चर्चेत घेउनच विकास साधला जावा असे लोकनियुक्त नगर सेवकाची भावना असते.
सुधीरभाऊनी मुलं शहरचा चेहराबद्लविन्याचा प्रयत्न केला खरा, पण उपविभागीय अभियंता यांनी नगर पालिका प्रशासनास पर्यायाने अधिकारी व पदाधिकारी यांना येणाऱ्या निवडणुकीत लोकांसमोर न येण्याचे कुभांड तर रचले नाही ना अशीही शंका उपस्थित केली जात आहे. कामाचा दर्जा बघता कामाच्या तपासण्या व आर्थीक तपासणी करण्याचे महत्कार्य आता आमदार सुधिरभाऊ यांनी पुढाकार घेऊन करावे असे नागरिकांना वाटल्यास नवल नसावे.