मंगेश पाचभाई यांच्या मागणी ला यश.
मांगली येथे आज लसीचे 100 डोस उपलब्ध.
45 वरील नागरिकांनी लाभ घ्यावा डॉ मोहन गेडाम याच आवाहन.
यवतमाळ:- झरी-जामनी दुर्गम तालुक्यातील मांगली,कोसारा येथे लसीकरण केंद्र नसल्याने जनतेला मुकुटबंन प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी लागत होती.
मांगली, कोसारा ते मकूटबंन अंतर दूर असल्या मुळे व लॉकडावून मुळे खासगी वाहने सुद्धा उपलब्ध होत नव्हती तसेच जेष्ठ नागरिकांना ये- जा करण्यास नाहक त्रास होत होता हाच मुद्दा घेऊन युवा नेते मंगेश पाचभाई यांनी तालुका वैदकीय अधिकारी डॉ मोहन गेडाम याना निवेदनाद्वारे झरी तालुक्यात कोसारा ,मांगली लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली असता आरोग्य विभागाने आज मांगली केंद्र सुरू करून मांगली लसीकरण केंद्रा वर 100 लसीचे डोस 45 वरील नागरिकांना उपलब्ध करून दिले.
युवा नेते मंगेश पाचभाई यांच्या अखेर प्रयत्नाला यश आलं व कोसारा लसीकरण केंद्र सुद्धा पुढील चार दिवसात सुरू करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मांगली केंद्रा वर आज लसीचे 100 डोस उपलब्ध झाले असून 45 वरील नागरीकांनी लाभ घ्यावा.
डॉ मोहन गेडाम
तालुका वैदकिय अधिकारी
झरी-जामनी