Top News

नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिवती तालुक्यासाठी 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकार


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता तिचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहायचे आहे. आपल्याला जनसेवेसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे . संकटसमयी मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता आपले नेते नितीनजींनी सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी जो पुढाकार घेतला तोच आदर्श समोर ठेवून आपणही सेवाकार्य करू , असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 9 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर चे वितरण करण्यात आले. यात प्रामुख्याने जिवती तालुक्यासाठी 2 दुर्गापूर साठी 3 ,वरोरा साठी 2, गडचांदूर साठी 2 असे एकूण 9 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वितरित केले.यावेळी भाजप नेते रामपाल सिंह , हनुमान काकडे, गौतम निमगडे , जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते, दत्ताजी राठोड, तिरुपती कुंडगिर , सुधाकर राठोड , वरोरा येथील भाजप नेते बाबा भागडे, डॉ भगवान गायकवाड , जगदीश तोटावार, गडचांदूर येथील सतीश उपलेंचवार , रामसेवक मोरे , नथु नक्षीणे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पंचायत समिती उपसभापती श्नी महेश भाऊ देवकते व भाजप पदाधिकाऱ्यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने