Top News

सहा परिचरिकांना जन्म देणारी माऊली लेकीच्या कुशीत विसावली; मुलींनीच केले अंत्यसंस्कार.


Bhairav Diwase. May 13, 2021
सोलापूर:- मोठी मुलगी विठाबाई शरणवीर क्षीरसागर आणि दुसरी अनुराधा अशोक भोसले या दोघींनी परिचारिका पदविका ( एएनएम) पूर्ण केले तर मनुबाई राजेंद्र शिंदे, शोभा राहुल क्षीरसागर, रोहिणी किरण पवार, मीराबाई महादेव भोसले या चारही मुलींनी याच क्षेत्रातील (जे एन एम) पदवी संपादन केली. दोघी आरोग्य विभागाच्या शासकीय सेवेत तर चौघी खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा बजावत आहेत. चव्हाण दाम्पत्याला समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी या सहा बहिणी सेवाभाव जपत आहेत. आज मंगळवारी जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला सहा परिचारिकांना जन्म देणाऱ्या कलावती चव्हाण यांचे निधन झाले. निधनानंतर मुलींनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
आपल्या आईवडिलांची मुलाप्रमाणे या सहा बहिणी सेवा करीत असत. त्यांना जीवनात कुठलीच कमतरता भासू नये यासाठी त्यांची धडपड असे. आई कलावती यांना आठ दिवसापूर्वी उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा बजावणाऱ्या शोभा आणि रोहिणी आईच्या दिमतीला होत्या. आज सकाळी दोघी तिची शुश्रूषा करताना आईने दोघींच्या कुशीत प्राण सोडले. आईवडिलांच्या सेवेसाठी सतत स्पर्धा करणाऱ्या या भगिनीमध्ये शोभा आणि रोहिणी या दुःखद प्रसंगातही त्यांना समाधान मिळवून देणाऱ्या ठरल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने