Top News

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने घेतली परिचारिकांच्या कार्याची दखल

सन्मानपत्र आणि भेट वस्तू देऊन केला सत्कार


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- परिचरिकांनी मागील एक वर्षाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना दिलेल्या अमूल्य सेवेची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती तालुका शाखेने दखल घेऊन आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्य परिचारिकांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन नुकताच सत्कार केला.
येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन समारंभात सर्वप्रथम फ्लारेंस नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला वैद्यकीय अधीक्षक डाॅ.मनीष सिंग यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन उद्घाटन करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.नितीन सातभाई, अधिपरिचारिका भाग्यश्री उमाटे, रुग्णकल्याण समिती सदस्य बाळुभाऊ चाफले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे, तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे, तालुका कार्यकारिणी सदस्य पवन शिवनकर, पुंडलिक येवले, विनोद ठाकरे आणि इतर परिचारिका व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने डाॅ.सिंग, डाॅ.सातभाई, रुपचंद धारणे, शंकर बोरघरे, पवन शिवनकर, पुंडलिक येवले, विनोद ठाकरे आणि बाळुभाऊ चाफले यांच्या हस्ते उपस्थित सर्व परिचारिकांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अधिपरिचारिका भाग्यश्री उमाटे यांनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाबद्दल सविस्तर माहिती दिली व पत्रकार संघाने सत्कार केल्याबद्दल पत्रकार संघाचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने