कॉंग्रेसचे माजी आमदाराच्या पुत्राचा डॉक्टरवर हल्ला.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोवीड सेवा केंद्रावरील कर्तव्यावर असलेले डॉ अभिजित मारबते यांना मारहाण केली.
    लारेन्स गेडाम याने कोविड सेंटर वर जाऊन येथे मागील दोन महिन्यापासून कोविड केंद्रातच मुक्काम करून रुग्णांना सेवा देणारे युवा डॉ. अभिजित मारबते यांच्या सोबत कारण नसताना मारहाण केली आहे.  या केंद्रात डॉ. अभिजित मारबते हे सतत ड्युटी करीत आहेत. त्यांनी एकही दिवस सुट्टी न घेता तसेच केंद्रात राहून रुग्णाची अहोरात्र सेवा करीत आहेत.

कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा हा गुंड प्रवृतीचा असून विधान सभा निवडणुकीत त्याच्यावर उमेदवार बग्गु ताडाम यांच्या अपहरण करण्याचा गुन्हा लारेन्स गेडाम वर दाखल झाला आहे. या प्रकरणात कॉंग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार आनंदराव गेडाम यांना मुलासह पूर्ण पूर्ण निवडणूक प्रचार होई पर्यंत फरार व्हावे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने यांचा जामीन नाकारल्याने ते स्वतहून कोर्टात हजर झाले. लारेन्स गेडाम हा जामीन वर आहे.हे विशेष.
    गुंड प्रवृतीचा लारेन्स गेडाम यास तत्काळ अटक करण्यात यावी यासाठी पोलीस स्टेशन आरमोरी येथे नागरिक पोहचले होते. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, डॉक्टर, नर्स हे संपावर जाण्याची माहिती प्राप्त झाली आहे.