Top News

25 वर्षीय युवकाचा जंगलात संशयास्पद मृत्यू.

जंगलात पंधरा दिवसांपासून मृतदेह झाडालाच.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपूरी:- तोरगाव (बु) येथिल रहीवाशी युवकाचा पहार्णी लगत असलेल्या जंगलात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारला उघडकीस आल्याने परीसरात खळबळ उडाली असून अंकीत बंडुजी फुलबांधे (२५) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार अंकीत २४ एप्रील ला घरची दुचाकी एक्टीव्हा क्र एम एच ४० बिएच ६६५४ घेऊन घरून कुटूंबियांना काहीच माहिती न देता निघाला होता. त्यानंतर घरी परत न आल्याने कुटुंबियांनी इतरत्र शोधाशोध सुरू केली. मात्र कुठेही पत्ता लागला नाही.
अखेर पंधरा दिवसानंतर इसमाचा मृतदेह नागभिड तालुक्यातील पहार्णी गावा लगत असलेल्या जंगलात झाडाला गळफास लावून असलेल्या स्थितीत ढोरपा येथिल तेंदुपत्ता तोडणाऱ्या नागरीकांना सकाळच्या सुमारास आढळला. त्यांनी याची माहिती परीसरात नागभिड पोलिस स्टेशनला दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरीता नागभिड येथिल ग्रामिण रुग्णालयात पाठवला.मृत्यूचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पुढील तपास नागभिड पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने