Top News

ब्रम्हपूरी क्षेत्रातील विकासकामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर.

सावली तालुक्यासाठी 2 कोटी 25 लक्ष निधी, ब्रम्हपुरी तालुक्यासाठी 1 कोटी 60 लक्ष व सिंदेवाही तालुक्यासाठी 2 कोटी 5 लक्ष निधी मंजूर.

ना. विजय वडेटटीवार यांच्या पुढाकार.

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली आणि सिंदेवाही तालूक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध कार्यक्रम एकाच ठिकाणी, एकाच व्यासपिठावर करण्यासाठी प्रत्येक गावात सुविधा युक्त समाजमंदिर व सभागृह बांधण्याचे नियोजन या क्षेत्राचे आमदार व जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेटटीवार यांनी केले. त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच व केलेल्या प्रयत्नामूळेच ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील विविध विकासकामासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गंत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत विकासकांना 5 कोटी 90 लक्ष रुपये निधीच्या कामांना नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेटटीवार यांच्या प्रयत्नामूळे ब्रम्हपूरी क्षेत्रात विकासकामांना गती मिळालेली असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राज्याचे मंत्री विजय वडेटटीवार हे ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली व सिंदेवाही तालूक्यातील सर्व गावांचा जनसंपर्क अभियानातंर्गत झंझावती दौरा करून गावातील अडिअडचणीबाबत नागरिकांसोबत चर्चा करीत असतात. या दौऱ्याप्रसंगी विविध विकासकामा संदर्भात नागरिकांनी मागणी केली असता त्या कामाची नोंद आपल्या डायरीमध्ये करुन संबधित अधिका-यास शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगत होते. हे सर्व प्रस्ताव शासनाकडे सादर होताच निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन मंजूर होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्‍यांच्या अथक परिश्रमाला यश आले असून नुकतेच मंजूर करण्यात आलेल्या सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गंत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत विकासकांना या योजनेतंर्गत सावली तालुक्यातील डोनाळा येथे बौध्द विहिराजवळ समाजमंदिराचे बांधकाम करणे २० लक्ष, सोनापूर येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे २० लक्ष, निफंद्रा येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे ३५ लक्ष, अंतरगाव येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे ३५ लक्ष, कवठी येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे ३० लक्ष, चिखली येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे २० लक्ष, सामदा बुज येथे आदिवासी मोहल्यात समाजमंदिराचे बांधकाम करणे १५ लक्ष, खेडी येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे ३० लक्ष, चकमानकापूर येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे २० लक्ष, ब्रम्हपूरी तालूक्यातील कळमगाव येथे हमुनाम मंदिराजवळ समाजमंदिराचे बांधकाम करणे २० लक्ष, रामपूरी येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे २० लक्ष, एकारा येथे आदिवासी मोहल्यात समाजमंदिराचे बांधकाम करणे २० लक्ष, चोरटी येथे वाल्मिकी वार्डात समाजमंदिराचे बांधकाम करणे २० लक्ष, आकापूर रुपाळा येथे हनुमान मंदिराजवळ खुल्या जागेत सभागृहाचे बांधकाम करणे २० लक्ष, जुगनाडा येथे वडाचा टेकर परिसरात सभागृहाचे बांधकाम करणे ३० लक्ष, सायगाव येथे दलित वस्तीमध्ये बौध्द समाज परिसरात सभागृहाचे बांधकाम करणे १५ लक्ष, मुडझा येथे दलित वस्तीमध्ये बौध्द समाज परिसरात सभागृहाचे बांधकाम करणे १५ लक्ष, सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे दलित वस्तीमध्ये समाजमंदिराचे बांधकाम करणे २० लक्ष, पळसगाव जाट येथे बौध्द विहाराला वॉल कंपाउड व सौदर्यीकरण करणे ३५ लक्ष, नाचनभटटी येथे वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे २० लक्ष, रत्नापूर येथे वाचनालयाचे बांधकाम करणे २० लक्ष, चिखल मिनझरी येथे सभागृहाचे बांधकाम करणे २५ लक्ष, देवाळा अंतर्गत ग्रामपचांयत उमरवाळी येथे आदिवासी मोहल्यात समाजमंदिराचे बांधकाम करणे २५ लक्ष, देलनवाडी येथे दलित दलित वस्तीमध्ये बौध्द समाज परिसरात सभागृहाचे बांधकाम करणे १५ लक्ष, मरेगाव येथे दलित वस्तीमध्ये बौध्द समाज परिसरात सभागृहाचे बांधकाम करणे १५ लक्ष, जामसाळा येथे दलित वस्तीमध्ये बौध्द समाज परिसरात सभागृहाचे बांधकाम करणे १५ लक्ष], नैनापूर येथे सभागृहाचे बांधकाम करणे १५ लक्ष अशा प्रकारे ५ कोटी ९० लक्ष रुपये मंजूर करुन या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

विजय वडेटटीवार यांनी प्रतिनिधीसोबत बोलतांना म्हटले की या क्षेत्राचा आमदार म्हणून या क्षेत्रातील अविकास असलेल्या भागाचा विकास करणे हे उदेश ठेवून काम सुरु केले त्यात मोठया प्रमाणात यश आले. गेल्या वर्षी करोडो रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली मात्र गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुभावामूळे विकासकामांना सुरुवात करता आले नाही. गेल्या वर्षीपासून तर आतापर्यत मंजूर करण्यात आलेले सर्व विकासकामांना येत्या काही दिवसात सुरु होणार असून या क्षेत्राच्या सर्वांगिन विकासासाठी कठीबध्द आहे असे त्यांनी म्हटले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने