जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

पुलावरून ट्रक कोसळून एक ठार तर दोघे जखमी.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील सोंडो गावापासून काही अंतरावर असलेल्या लोखंडी पुलाच्या वळणावर एक ट्रक पुलावरून अंदाजे ५० फूट खाली कोसळला. यात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजता घडली.
रवी तल्लू असे मृताचे नाव आहे तर रवीकुमार चौरसिया व जाणिकराव अशी जखमींची नावे असून सर्व जण छत्तीसगड राज्यातील रहिवासी असल्याचे समजते. सदर ट्रक (क्रमांक सीजी २९ एल ०५८५) आसिफाबाद येथून चंद्रपूरकडे येत होता.
दरम्यान, सोंडोगावाजळच्या लोखंडी पुलाच्या वळणावरून नियंत्रण सुटून ट्रक पुलाखाली कोसळला. यात रवी तल्लू हा जागीच ठार झाला तर रवीकुमार चाैरसिया व जाणीकराव जखमी झाले. दोघांना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत