Top News

कोरोना काळातही वृक्षप्रेमींचा वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन जागर प्रेरणादायी.

राजुरा येथील वृक्षप्रेमी भास्कर सर यांचा उपक्रम


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोना जागतिक महामारीच्या संकटात प्रत्येक माणूस हतबल झालेला आहे. कोरोनामुळे जगासमोर मोठे आव्हान निर्माण केलेले आहे . शहरापासून ते खेड्यापर्यत कोरोना संसर्ग चा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे सामान्य जीवन भयभीत झालेले आहे .अशा संकटात गेल्या वर्षभरापासून जि प उ प्राथ शाळा कोष्टाला येथील उपक्रमशील शिक्षक वृक्षप्रेमी भास्कर सर राजुरा शहरात व परिसरात वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन करीत असल्यामुळे राजुरा व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
हा उपक्रम नागरिकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. वृक्षप्रेमी कुणाल चन्ने यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून वृक्षप्रेमी भास्कर सर यांनी राजुरा येथील मालगुजारी तलाव ,स्वामी विवेकानंद नगर, गणपती मंदिर परिसर , ग्रामीण रुग्णालय राजुरा , तक्षशिलानगर बामनवाडा , छत्रपती शिवाजी महाराज बालोध्यान, नवजीवन क्वालोनी , संकटमोचन हनुमान मंदिर राजुरा , येथे विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण करून संवर्धन करण्याचा विडा उचलला आहे . एवढेच नव्हे तर ज्यांचा वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस असतो अशावेळी ते त्यांना विविध वृक्ष भेट देतात . आतापर्यंत त्यांनी विविध वृक्ष जसे आंबा, पिंपळ , वड, आवळा , कडुलिंब. करंजी , भोकर , वृक्ष भेट दिले व वृक्षरोपण केलेले आहे .सकाळी व सायंकाळी 2 तास वृक्षाच्या संवर्धनात सतत मग्न असतात.
एकीकडे कोरोना काळात ऑक्सीजनसाठी नागरिकांचा जीव कासावीस होत असताना झाडे लावा -झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत त्यांनी वृक्षरोपण केले आहे .त्यांनी आतापर्यंत स्वतःची प्रसिद्धी न करता नियमितपणे वृक्ष लागवड व संवर्धन करीत आहे . वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन याबरोबरच त्यांनी पक्ष्यांच्या पाण्यासाठी रिकाम्या प्लास्टिक बॉटल गोळा करून त्याचा वापर पाणी पिण्यासाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारत लॉज राजुरा ते स्वामी विवेकानंद नगर पर्यन्त झाडांना बांधून त्याचा वापर केलेला आहे. एवढेच नव्हे तर हा उपक्रम आपल्या गावात व विध्यार्थी यांच्यात रुजविण्यासाठी त्यांना प्रेरणा सुद्धा देत असतात. 
             त्यांच्या या कार्यात त्यांना विविध मान्यवरांचे व नागरिकांचे  सहकार्य लाभत आहे त्यामध्ये मा अरुणभाऊ धोटे, नगराध्यक्ष राजुरा, मा सर्वानंद वाघमारे, राममोहन पेंदापल्लीवार वनपाल, मा कुंदोजवार वनपाल, डॉ उमाकांत धोटे, गौतम देवगडे, किशोर पडोळे सर, पाचभाई काकाजी, शरदचंद्र मासिरकर, पेचे सर, मा. बाबूराव मडावी, मा विजय परचाके, गटशिक्षणाधिकारी राजुरा, मा. शेषराव वानखेडे केंद्र प्रमुख, मा केवलदास तोडे केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
त्याचप्रमाणे आज भारतीय जनता पक्षाचे नगरसेविका उज्वला जयपूरकर यांच्या मुलाचा वाढदिवसानिमित्त आवळा वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने