जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🇮🇳

🇮🇳 🙏

🙏🏻

नगर पंचायतची सँनिटायझर फवारणी मशीन धुळखात पडून?

गावात लावलेले हात धुवाचे मशीन बेपत्ता!

शहरात फवारणी करावी, सतीश बोम्मावार यांची मागणी.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- गेल्या आठ महिन्यापासून सावली शहरात लाख रुपये खर्च करून आणलेली फवारणी मशीन धूळखात पडली असून ती लवकरात लवकर दुरुस्त करून सावली शहरात फवारणी करावी अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांनी न.प. प्रशासकाकडे केली आहे.

मागील वर्षी कोरोना संसर्ग महामारी च्या पार्श्वभूमीवर सावली नगरपंचायतीने हजारो रुपये खर्च करून सँनिटायझर फवारणी मशीन खरेदी केली होती . मात्र , ही सँनिटायझर फवारणी मशीन धूळखात पडली असल्याने याकडे सावली नगरपंचायत प्रशासक कानाडोळा करुन वेळ काढूपणा करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
पहिल्या लाटेत बऱ्याच लोकांना, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सावली नगरपंचायत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजनांची अमंलबजावणी सुरु केली.तसेच नगरपंचायत अंतर्गत प्रभागातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आणल्या तसेच शहरात दाखल होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, नागरिकांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश देण्यात येत होता. बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या घरांचे, वाहनांचे सँनिटायझर करण्यात येत होते. करिता लाख रुपये खर्च करून सँनिटायझर फवारणी मशीन खरेदी केली. त्या मशीनद्वारे वाहने, प्रभाग परिसर सँनिटायझर करण्यात येत होता. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर ही यंत्रना बंद करण्यात आली. सध्या ही सँनिटायझर फवारणी मशीन न.पं. मध्ये धुळखात स्थितीत पडलेली आहे . याकडे मुख्याधिकारी आणि कर्मचारी कानाडोळा करत असल्याचे चित्र पुढे आले आहे. तसेच मागील वर्षी तीन चार ठिकाणी नागरिकांना हात धुण्यासाठी आयडीबीआय बँक , महाराष्ट्र बँक , नगरपंचायत समोर अशाचप्रकारची हँण्डवाँश सँनिटायझर मशीन लावण्यात आल्या होत्या पण त्यासुद्धा काही दिवसातच बंद पडल्या आणि मागील वर्षभरापासून या मशीनींचा सांगाडाच उभा असल्याचे वास्तव आहे.
                    
      सावली नगरपंचायत प्रशासनाने दुसऱ्या कोरोना लाटेच्या पाश्वभुमीवर कोणतीही ठोस उपाययोजना केली गेली नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे . त्यामुळे अधिकारी मात्र फक्त कागदोपत्री आदेश काढतात त्याची अमंलबजावणी होते का नाही याची पाहणी होत नसल्याने सध्या मनमानी कारभार सुरु आहे . 
                               
         प्रवेशद्वारावर कोणत्याही अधिकाऱ्यांची ,  कर्मचाऱ्यांची , नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात नाही . तसेच ५०% कर्मचारी उपस्थित राहाण्याचा आदेश शासनाने काढूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही . त्यामुळे हा आदेश कागदोपत्रीच काढला की काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
         
                 तसेच मागील वर्षी बहुतांश कार्यालयात हायड्रोक्लोरिक्कीनद्वारे फवारणी करण्यात येत होती . मात्र ती सुध्दा फवारणी सध्या बंद असल्याचे दिसत आहे . कागदावर कार्यवाही होत असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही.त्यामुळे प्रशासकांनी याकडे अधिक लक्ष देवून फवारणी मशीन दुरुस्ती करून सावली शहरात फवारणी करावी अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत