Top News

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी सचिन तंगडपल्लीवार कायम.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सावली:- कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक पद सचिन तंगडपल्लीवार यांचे रद्द करण्यात आले होते. ते पुन्हा कायम करण्यात आले असून आज झालेल्या मासिक आभासी सभेला ही त्यांनी उपस्थीती दर्शविली.

कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथील तीन मासिक सभेला उपस्थीत राहत नसल्याच्या कारणावरून सभापती हिवराज शेरकी यांनी सचिन तंगडपल्लीवार यांचे संचालक पद रद्द केले होते. त्यामुळे सचिन तंगडपल्लीवार यांनी विभागीय सहनिबंधक नागपूर यांचे कडे दाद मागितली. त्या मासिक सभेच्या दरम्यान सचिन तंगडपल्लीवार यांना कोरोना झालेला होता. त्यामुळे ते बैठकीला उपस्थीत राहू शकले नाही. तसेच एका बैठीकाच्या दरम्यान त्यांचा आईचे निधन ही झालेले होते. या सर्व बाबी माहिती असतानाही राजकीय सूडबुद्धीने संचालक रद्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. अशी माहिती सर्व कागदपत्रे सह सादर केल्यांनंतर नागपूर विभागीय सहकार उपनिबंधक यांनी सचिन तंगडपल्लीवार यांचे संचालक पद कायम ठेवत असल्याचा निर्वाळा दिला. तसे पत्र ही कृषी उत्पन्न बाजार समिती ला दिले असल्याची माहिती आहे. आज दिनांक 8 मे ला आभासी मासिक सभा आयोजित करण्यात आली असून सभेला उपस्थीत राहावे असे पत्र बाजार समिती च्या वतीने सचिन तंगडपल्लीवार यांना पाठविण्यात आले. त्यावरून आज ते सभेला उपस्थीत होते.
राजकीय सूडबुद्धीने माझे संचालक पद काढले. मात्र मी व्यापारी व शेतकरी यांचे आशीर्वाद मला प्राप्त असून त्यांचा हितासाठी माझे संचालक पद कायम असल्याची प्रतिक्रिया सचिन तंगडपल्लीवार यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने