Top News

पल्लेझरी ता. जिवती येथील बोगस विहिरीच्या कामाची चौकशी करून काम तातडीने रद्द करण्यात यावे

शिवसेना महिला तालुका सघंटिका सिंदुताई राठोड यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- खनिज विकास कार्यक्रम 2018-2019 च्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना पल्लेझरी याचे प्रत्यक्ष कामास जेंव्हा सुरुवात झाली त्यावेळी मला व समस्त गावकरी यांना असे निदर्शनास आले कि या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस काम होत आहे. जुन्या गावामध्ये एक जुनी विहीर आहे त्या विहिरीतील पाणी cloried युक्त आहे व त्या पाण्यामुळे गावात आरोग्य विषयक समस्या निर्माण होत होत्या त्या पाण्याची प्रयोगशाळा तपासणी करून तसा अहवाल दिला होता त्यामुळे जुन्या विहिरीचे काम शासनाने स्थगित केले होते.
मात्र नव्याने मंजूर करण्यात आलेल्या योजने अंतर्गत नवीन विहिर खोदने गरजेचे असताना पैश्याचा अपहार करण्यासाठी नवीन विहीर खोदकाम न करता जुन्या विहिरीतील घाण काडून बांधकाम करून शासनाची व ग्रामस्थ यांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे
या कामाची अंदाज पत्रका नुसार रक्कम 2799637 इतकी आहे परंतु या कामात तसा कुठलाही खर्च न करता सदर कंत्राटदराने मोठा अपहार केला आहे तरी आपण या कामाची सखोल चौकशी करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही तक्रार अर्जाच इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने