Top News

सरकारच्या वृत्तीला साजेचा असा हा निर्णय:- आ. सुधीर मुनगंटीवार

Bhairav Diwase. May 27, 2021

चंद्रपूर:- सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री असताना जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "हा निर्णय लोकांनी घेतला होता. 588 ग्रामपंचायतींनी हा ठराव केला होता. 5000 पेक्षा जास्त महिला त्यासाठी अणवाणी चालत गेल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यात अभय बंग आणि विकास आमटेसुद्धा होते. त्यांच्या समितीने दारूबंदीची शिफारस केली होती. फडणवीस सरकारनं फक्त त्याची अमंलबजावणी केली होती."
बोलताना ठाकरे सरकारवर टीका करताना मुनगंटीवार पुढे म्हणाले "या सरकराने कायमच दवा की दारू यापैकी कायम दारूला महत्त्व दिलं आहे. आरोग्यासाठी दारू चांगली असल्याचा त्यांचा समज असावा. म्हणून गेल्या वर्षभरात त्यांनी 4 मोठे निर्णय घेतले. लॉकडाऊनमध्ये कुणाला सूट देण्यात आली नाही. पण दारू विक्रेत्यांना सूट देण्यात आली. कोरोनाच्या संकटातही वाईन प्रमोशनसाठी तरतूद करण्यात आली. या सरकारच्या वृत्तीला साजेचा असा हा निर्णय आहे."
"दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी ऊभी बाटली आडवी करत आणलेली दारूबंदी या सरकारने शेवट रिचवलीचं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने