Top News

तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला.

वाघाचा हल्ला महिला गंभीर जखमी.

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने देशात व राज्यात लाकडाऊन करण्यात आले. त्यामुळे रोजगार नसल्याने सर्व मजुरांचे काम बंद झाले होते. आणि मजुरावर व त्यांच्या कुटुंबातील सर्व येक्तीवर उपासमारीची वेळ आली. अश्या परिस्थितीत तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्याने या परिसरातील मजुरांनी तेंदू शपत्ता संकलन करून उपासमारीचा प्रश्न सोडविला आहे. सद्या तेंदूचा हंगाम असून तेंदू संकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक रोजगार परिसरातील जंगल भागात महिला, पुरुष जात आहे.
आज सावली तालुक्यातील गेवरा येथील शकुंतला दिवाकर चौधरी वय 50 वर्ष ही महिला काही महिलांसोबत तेंदूपत्ता संकलन करीत असतांनाच गोसेखुर्द च्या मोठ्या नहराजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने या महिलेवर हल्ला करीत गंभीर जखमी केले. मात्र सोबतच्या महिलांनी प्रचंड आरडाओरड केल्याने वाघ घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती वनविभाग ला देण्यात आली.
वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्या जखमी महिलेला प्रथम अंतरगांव येथील प्राथमिक स्वास्थ केंद्रात भरती केले. त्या नंतर तिला पुढील उपचार साठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. या परिसरात वाघाच्या हल्याचे प्रमाण वाढत असून शेतकरी ही भयभीत झालेले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर जखमी महिलेला आर्थिक मदत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने