Top News

वाहन चालकांना आर्थिक पॅकेज द्या.

तहसीलदार मार्फत मुख्यमंत्रीना दिला निवेदन.

जय संघर्ष वाहन चालक/मालक सामाजिक संस्था सावली यांची मागणी.


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- मागील वर्षी माहे मार्च / 2020 पासुन कोविड 19 च प्रादुर्भावामुळ शासनाने लॉकडॉऊन लावलेला होता. त्यानंतर माहे डिसेंबर 2020- जानेवारी 20201 मध्ये थोडी सुट मिळाली आणि ठप्प झालेला टॅक्सी व्यवसाय पुन्हा सुरु झाला होता. परंतु माहे मार्च / 2021 पासुन पुन्हा शासनाने लाकडाऊन सुरु केला. त्यामुळे सर्व पर्यटन स्थळे, मंदीर, यात्रा, लग्न कार्य हे बंद आहेत. तसेच शाळा, कॉलेजेस सुध्दा बंद आहेत. याचा विपरीत परिणाम हा टुरिस्ट टॅक्सी, व्यावसायीक प्रवासी वाहन व्यवसायावर पडला आहे.

व्यावसायीक प्रवासी वाहनांचे वार्षिक टैक्स, वाहतुक टॅक्स, इंश्युरन्स, बँक कर्ज हप्ते माफ होणे बाबत तसेच वाहन चालकांना आर्थीक पॅकेज देऊन मदत करावी व लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, असे न झाल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील व्यावसायीक प्रवाशी वाहन चालक मालक रस्त्यावर उतरतील आणि राज्यातील सर्व वाहन हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे करण्यात येईल, असा इशारा जय संघर्ष वाहन चालक / मालक सामाजिक संस्था, शाखा सावली जिल्हा चंद्रपूर यांनी दिला आहे.

मागील वर्षी माहे / 2020 पासुन आजपावेतो व्यवसाय बंद असल्यामुळे सध्या वाहनावर असलेले बँकेचे किंवा खाजगी संस्थेचे कर्ज, वाहनाचे इंश्युरन्स, रोड टॅक्स भरायचे कसे असा प्रश्न सर्व व्यावसायीक प्रवासी वाहन मालकांना पडला आहे. त्यामुळे सर्व टुरिस्ट टॅक्सी, व्यावसायीक प्रवाशी वाहन चालक मालकाच्या खालील प्रमाणे मागण्या असून त्यावर आपणाकडुन सहानुभूतीने विचार करण्यात यावा व आर्थीक मदत तसेच सुट देण्यात यावी.

सदर निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आले....
१) सतत एक वर्षा पासुन व्यावसायीक प्रवासी वाहनांचा व्यवसाय बंद असल्यामुळे वाहनावरील कर्जाचे हप्ते हे किमान सहा महिन्याकरीता विनाव्याजी पुढे ढकलण्यात यावं.

२) बँकांकडुन कोणत्याही व्यावसायीक प्रवासी वाहन मालकावर जोर – जबरदस्ती अथवा फोनद्वार मानसोक आस देणार नाही असे आदेश बँकांना निर्गमीत करावे.

३) ज्या व्यावसायीक प्रवासी वाहनांचे इंश्युरन्स नुतनीकरण केले आहे असे वाहन प्रादेशीक परिवहन अधिकारी यांचे सम्मतीनुसार ( No Use Cetificate ) पाकीग यार्डमध्ये उभे आहे.

४) त्यांचे इंश्युरन्स जेव्हापर्यंत व्यावसायीक वाहनांचा व्यवसाय पुर्ववत सुरु होत नाही तेव्हा पर्यत इंश्युरन्स Extend करण्याचे आदेश संबंधीत प्रादेशीक परिवहन अधिकारी यांना निर्गमीत करावे .

५) मार्च / 2021 नंतर ज्या व्यावसायीक प्रवासी वाहनांचे टॅक्स भरने आहे अशा व्यावसायीक प्रवासी वाहनांच टॅक्स Carry Forward करावे .

मार्च / 2020 पासुन सर्व शाळा , महाविद्यालये बंद आहेत त्यामुळे सर्व स्कुल बस , स्कुल वॅन यांचे टैक्स शाळा / महाविद्यालये सुरु होत नाही तोपर्यंत माफ करावे . पर्यटन स्थळे , मंदीर , याञा , लग्न समारंभ , शाळा , महाविद्यालय मागील एक वर्षा पासून बंद असल्यामुळे व्यावसायीक प्रवासी वाहन चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलली आहे . त्यामुळे अशा सर्व व्यावसायीक प्रवासी वाहन चालक मालक तसेच स्कुल बस वाहन चालक , कंडक्टर यांना दर महा रुपये 10000 / – उदरनिर्वाहा करीता देण्यात यावी . जेणेकरून शाळा बंद असली तरी मुलांचे शिक्षणाची फी , घरभाडे , ईलेक्ट्रीक बील व परिवाराकरीता अन्नधान्याची व्यवस्था करता येईल . यापुर्वी सुध्दा या बाबत आमचे संस्थे कडुन शासनास अवगत करण्यात आलेले आहे . परंतु कोणतीही उचीत कारवाई करण्यात आलेली नाही . वरील सर्व मागण्याचा आपणाकडुन सहानुभूतीपुर्व विचार करुन आर्थिक पॅकेज द्यावा. असे न झाल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील व्यावसायीक प्रवाशी वाहन चालक मालक रस्त्यावर उतरतील आणि राज्यातील सर्व वाहन हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उभे करण्यात येतील असा इशारा देत आज दिनांक ११/०५/२०२१ ला मा. तहसीलदार श्री परीक्षित पाटील तहसील कार्यालय सावली यांच्या मार्फत मा.उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात सुधिर भाऊ टोंगे महाराष्ट्र सह संघटक, उमेश आजबले चंद्रपुर जिल्हा नियोजन प्रमुख, रवि झरकर चंद्रपुर जिल्हा सह कार्याध्यक्ष, कैलास कापगते सावली तालुका अध्यक्ष, विक्रांत भोयर सावली तालुका उपाध्यक्ष, रोशन मिरुगवार, मयुर दुधे, निलेश वद्दलवार, हरीदास कातलवार तथा सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने