विरूर स्टेशन येथे कोरोना लसीकरण केंद्र शुरू करण्याची मागणी

Bhairav Diwase
विरुर स्टेशन शाखेतील भाजपा तर्फे निवेदन


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
विरुर स्टे:- मागील महिण्यापासुन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ख़ुब वाढला आहे. गावोगावी कोरोनाची लागण झालेली आहे.अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली (बु.) येथे मागील दोन महिण्यापासुन लस दिली जात आहे.


परंतु विरूर स्टे. व इतर 10 गावातील लोकांना कोविड लसीकरण करिता चिंचोली जाण्यास एसटी बस बंद असल्याने अन्य वाहन साधन उपलब्ध नाही. यामुळे क्षेत्रातील अनेक लोकांना लसीकरण केंद्रावर पहुचण्याकरिता कमालीचा त्रास होत असुन कित्येकांना लसीकरणापासुन वंचीत रहावे लागत आहे.करिता विरूर स्टे येथे तातडीने कोविड लसीकरण केंद्र शुरू करण्याकरिता माजी आमदार श्री.संजयभाऊ धोटे यांना निवेदन देतांना भाजप शाख़ा विरूर शहर अध्यक्ष श्री.भिमरावजी पाला सह सतिशभाऊ कोमरवेल्लीवार, श्याम कस्तुरवार,रामअवतार सोनी उपस्थित होते.