Top News

१८ ते ४४ वयोगटातील युवकांना लस बंद हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर तर्फे निवेदन सादर


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- आज दि. 17 मे 2021 रोज सोमवारला भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर ग्रामीण यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर ( ग्रामीण ) देवराव भोंगळे व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार मार्फत देऊन 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण सत्ता सुरू करण्यात यावे अशी मागणी केली.

आधी दुसरा डोस ची कालावधी 28 दिवस ते 45 दिवस होती पण नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार ही आता 90 दिवसावर करण्यात आलेली आहे.
सध्या जगभरात तसेच राज्यात कोविड १९ चे रुग्ण संख्याच्या प्रमाणानुसार १८ ते ४४ वर्षे वयातील युवकाना कोरोनाची लागण चे प्रमाण चंद्रपूर जिल्हा तसेच तालुक्यामध्ये जास्त आहे व या वयातील नागरिक सुपर स्पेडटर म्हणून पण आहे . तरी शासनाने १८ ते ४४ वपातील नागरिकांना सध्या लस उपलब्ध करून देण्यात आलेली होती पण ते आता पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील माहिती कार्यालयाला सूचना करून योग्य ते प्रकाशन करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच १८ ते ४४ वयातील नागरीकांना लस उपलब्ध करून देण्याचे करावे अशी मागणी युवा मोर्चा तर्फे करण्यात आली.


त्याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आदित्य शिंगाळे, पियुष मेश्राम, विद्यार्थी आघाडी जिल्हा महामंत्री प्रतीक बारसागळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने