तालुकाध्यक्ष संतोषभाऊ देरकर यांच्या नेतृत्वात निवेदन सादर
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोना काळात वाढती महगाई लक्षात घेता आधीच लोकांकडे काम नाही. त्यातही पेट्रोल, डिझेल,गॅस, तथा शेती उपयोगी रासायनिक खते यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता सामान्य जनतेचे जगणे कठीण होत आहे.
आधीच देशातील जनतेचे कोरोना मुळे आर्थिक स्थितीने कंबरडे मोडले असताना त्यातही महागाई डोके वर काढत आहे. त्यामुळे जनतेचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. त्यात ही महागाई पुन्हा भर पाडत आहे.
या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तहसीलदार राजुरा यांना निवेदन देण्यात आले.
या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री. संतोषभाऊ देरकर, शहर अध्यक्ष श्री.रखिबभाऊ शेख, युवक तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, राजुभाऊ ददगाळ, जहीर खान, संदीप पोगला, अंकुश भोंगळे, सुजित कावळे, विजय कुमरे, प्रसाद देशमुख, स्वप्नील बाजुजवार, एकनाथ कौरासे, मंगेश वाघमारे, राहुल वनकर, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.