Top News

कोरोना काळात वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतीवर आळा घालण्याची मागणी

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा .जयंतजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांच्या नेतृत्वात " केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ, तसेच नुकतीच "रासायनिक खतांच्या" किंमतीत केलेली 40%दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालया समोर " शेतकऱ्यांचा एकच नारा रासायनिक खतांची दरवाढ कमी करा " किसानो के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे " "महंगा सिलेंडर महंगा तेल मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल "मोदी हटओ किसान बचाओ "बेशरम मोदी होश मे आओ जनता से तुम ना टकराओ" असे नारे देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रासायनिक खतांच्या किमती 40% नी वाढविल्या, त्यामुळे मागील एक वर्षयंपासून कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे,शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचे काम केले आहे ,ही दरवाढ तात्काळ कमी करण्याच्या मागणी साठी केंद्र सरकार विरोधात निषेध करण्यात आला. यावेळी पोंभुर्णा शहर अध्यक्ष श्री.भुजंगभाऊ ढोले, तालुका कार्याध्यक्ष हिराजी पावडे, तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, ज़िल्हा सचिव रुषुजी हेपट, सेवादल तालुका अध्यक्ष संजय पावडे, पोंभुर्णा शहर संघटक श्री. अशोकजी सातपुते, देवेंद्र कष्टी तालुका सदयक्ष तथा ग्रा. प. सदयक्ष नवेगाव मोरे पोंभुर्णा शहर सरचिटणीस जगणजी कोहळे, शहर उपाध्यक्ष संजय येल्लुरवार, गंगाधर कोडगट्टीवार, दिनेशजी नैताम , विवेक लोणारे, अरुणजी गुरनुले संघटक पोंभुर्णा शहर, लक्ष्मण गुरनुले, निकेश कास्तावार इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने