जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

बोगस बियाण्यांच्या 250 बॅग जप्त.

1 लाख 87 हजारांचा माल जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- शेतकऱ्यांच्या खरिप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत, त्यातच काही संधीसाधू व्यापारी व दलालांनी अनाधिकृत बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारुन लाखो रुपयांची माया गोळा करण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे.
चंद्रपूर शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात बोगस बीटी बियाणे कृषी विभागाने जप्त केले होते, कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधात कृषी केंद्र सुरू असल्याने त्याचा फायदा घेत बोगस बियाण्याची वाहतूक करीत होते.
पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुनागुडा गावाजवळ पोलीसांनी गोपणीय माहितीच्या आधारे सापळा रचुन झायलो गाडी क्र. MH 34 AA 2151 मधुन बिल्ला नामक लेबल असलेले १०० बॅग, काव्या १०० राघवन ५० अशा एकूण २५० बॅग जप्त करण्यात आले.
वाहन चालक प्रकाश गोपीचंद चव्हाण ( ३८ ) राहणार डोंगरगाव तहसिल राजूरा याला अटक करण्यात आली आहे. बोगस बियाण्यांची किंमत 1 लाख ८७ हजार ५०० रुपये आहे.
सदरची कारवाही पोलिस उपनिरिक्षक निलम डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरिक्षक जमिल शेख ,रमाकांत कामळी, गुंडेराव पोले, परमविर खोबरे, निखिल ठाकरे प्रमेश्वर गडदे, सुरज जांभुळे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत