कार्यालयातील खुर्च्या व विद्युत मीटरची तोडफोड.
पोलिसात गुन्हा दाखल; आरोपी अटकेत.
पोंभूर्णा तालुक्यातील व मूल पोलीस ठाण्यात अंतर्गत येत असलेल्या ग्रोसरी ग्रामपंचायतीमध्ये सुधीर पोरेड्डीवार याने धुडगूस घालून कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर पोरेड्डीवार हा सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात गेला. उपस्थित असलेले उपसरपंच जितेंद्र चुधरी, संगणक परिचालक व विजय मारूती वाकुडकर या कर्मचाऱ्यांना माझी घरगुती जागा माझ्या नावे का करून देत नाही असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करत धुडगूस घातला. कार्यालयातील खुर्च्या व विद्युत मीटरची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले.
घटनेची तक्रार विजय मारोती वाकुडकर पाणीपुरवठा कर्मचारी यांनी दिल्यावरून मुल पोलीस ठाण्यात 353, 324, 332, 504 भादवी नुसार गुन्हा नोंद झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.