💻

💻

राजुरा वनपरीक्षेत्रातिल वन्यप्राण्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करा.- बादल बेले,नेफडो नागपूर विभाग सचिव

राजुरा वनपरीक्षेत्रात हरिण ,वाघ यांचा दुर्दैवी मृत्यू. 

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने दिले निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- मागील काही दिवसांपासून राजुरा वनपरीक्षेत्रात हरिणांसह वाघाच्या म्रुत्यूचे तांडव सुरू आहे आणि या संपूर्ण प्रकरणात वनवीभागाने सविस्तरपणे चौकशी करावी या मागणिचे निवेदन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले यांच्या नेत्रुत्वात वनवीभागास देण्यात आले.
५ जुन ला सायंकाळी व ६ जुन ला सकाळीच राजुरा -आसीफाबाद मार्गावर सुमठाना नियतक्षेत्रात दोन दिवसात दोन हरणांचा तर मध्य चांदा वनविभाग राजुरा वनपरीक्षेत्राचे विहिरगाव उपक्षेत्रात नियतक्षेत्र कक्ष १७२ मधे नर वाघ म्रूतावस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे रात्रौच या वाघाचे  शवविक्चेदन करून परस्पर त्या वाघाची  विल्हेवाट लावण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची उच्य स्तरीय चौकशी व्हावी यांकरीता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे तर्फे जिल्हाधीकारी ,चंद्रपुर ,मुख्य वनसंरक्षक ,चंद्रपुर वनव्रूत्त चंद्रपुर ,उप वनसंरक्षक मध्यचांदा वनवीभाग चंद्रपुर ,उपविभागीय वनअधिकारी राजुरा व वनपरीक्षेत्र अधिकारी राजुरा यांना निवेदने देण्यात आले. यावेळी नेफडो चे जिल्हा संघटक विजय जांभूळकर ,तालुका अध्यक्ष संतोष डेरकर ,आशीष करमरकर ,पूर्वा खेरकर ,सुजीत पोलेवार ,संदीप आदे ,सूनैना तांबेकर ,मेघा धोटे आदींची उपस्थिति होती.

          राजुरा वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांचा होत असलेल्या म्रूतू ची सखोल चौकशी व्हावी. रात्रौ ला त्या म्रुत् वाघाचे शववीचेदन करून रात्रौच विल्हेवाट का लावण्यात आली याचीही चौकशी व्हायला हवी. वन्य प्राण्यांचे वाढते म्रूतू रोखण्यासाठी वनविभागामार्फत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या. तसेच रस्त्याच्या कडेला प्राणाच्या बाबतीत माहिती फलक लावण्यात यावे जेणेकरून रस्ता ओलांडतांंना प्राण्यांचे अपघात टाळता येतील.
बादल बेले
नागपूर विभाग सचिव, नेफडो 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत