Top News

ग्राम पंचायत आंबोली चा एक नाविन्यपूर्ण उपक्रम.

पद मिळालेला प्रत्येक व्यक्ती "त्या" क्षेत्रात पदवीधर किंवा अनुभवी.
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- युवक वर्गाच्या नवनवीन विचार, संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहेत. जेव्हा ग्राम पंचायत निवडणूकीच्या रिंगणात तरुण पिढी उतरली. तेव्हा विरोधकांनी एक मुद्दा समोर आणला होता की नवीन पोर काय करणार, त्यांना अनुभव नाही. त्यामुळे भविष्यात जर आंबोली गावातील युवक निवडणूकित किंवा कोणत्याही क्षेत्रात जरी उतरलेत तरी त्यांना थोडाफार तरी अनुभव असावा हाच एकमेव उद्देश आहे. यामुळे गावातील संघटना शक्ती वाढून विकासाला नक्कीच हातभार लागणार आहे. आणि मुख्य म्हणजे पद मिळालेला प्रत्येक व्यक्ती त्या क्षेत्रात पदवीधर किंवा अनुभवी आहेत. (जसे की आरोग्य मंत्री एक डॉक्टर आहे, कृषी मंत्री कृषी पदवीधर आहे, कायदा मंत्री law चा विद्यार्थी आहे, ऊर्जामंत्री BE(ele.) आहे.) इत्यादी आणि सगळे युवक/युवती या आंबोली गावातीलच आहेत
ज्या क्षेत्रात पदवीधर किंवा अनुभवी आहे अश्यांना या मंत्रीमंडळात सामिल करुन घेतले आहे, क्रीडा मंत्री /आपत्ती व्यवस्थापन मंत्री स्वप्नील वाकडे, कृषी मंत्री स्वप्नील गजभे, कृषी राज्यमंत्री अंचल जांभुळे, स्वच्छता मंत्री सतीश शेंडे, आरोग्य मंत्री प्रणाली वाघमारे, औषधी प्रशासन मंत्री हर्षल ठाकरे, महिला व बालविकास मंत्री करिष्मा वाकडे, महिला व बालविकास राज्यमंत्री सोनू वांढरे, उद्योग मंत्री गजानन वाकडे,
शैक्षणिक उपक्रम मंत्री/उच्च शिक्षण राज्यमंत्री - जीवनदास पातूरकर, बांधकाम मंत्री धवल राखुंडे, वने व पर्यावरण मंत्री शरद वांढरे, वस्त्रोद्योग मंत्री विजय पसारे, इलेक्ट्रॉनिक मंत्री सुरेश वांढरे, मत्स्यपालन मंत्री विनोद नागपुरे, लाकूड व्यवसाय मंत्री रोशन वांढरे, कौशल्य विकास मंत्री विजय चौरे, कामगार मंत्री मंगेश रामेश्वर शिवरकर, कामगार राज्यमंत्री रितेश गजभे, ऊर्जा मंत्री कपिल अतकरे, जेष्ठ नागरिक कल्याण मंत्री सुखदेव जीवतोडे, मृदा व जलसंधारण मंत्री प्रशांत चुणारकर, पशुसंवर्धन मंत्री शुभम हिरामण ननावरे, दुग्धव्यवसाय मंत्री अक्षय दुर्गे, दुग्धव्यवसाय राज्यमंत्री प्रफुल गजभे, शेळीपालन मंत्री सतीश थाटकर, पर्यटन मंत्री प्रशिल चहांदे,
पर्यटन राज्यमंत्री अभिलाष भाशारकर, आदिवासी विकास मंत्री भोजराज वाकडे, आदिवासी विकास राज्यमंत्री राहुल जांभुळे, मानवसंसाधन मंत्री कैलास दडमल, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री पल्लवी बारेकर, व्यसनमुक्ती मंत्री निलेश लाकडे, गौण खनिज मंत्री मंगेश शिवकर, समाजकल्याण मंत्री/माहिती व प्रसारण मंत्री शुभम मंडपे, देखरेख विभाग/उच्च शिक्षण मंत्री अनुप शंभरकर, सूचना/तक्रार मंत्री नंदू ननावरे, नियोजन मंत्री विशाल भशारकर, सामाजिक न्याय मंत्री रुपेश बारेकर, परिवहन मंत्री प्रफुल देशकर, परिवहन राज्यमंत्री ऋषी निखाडे, फुल व फळे विकास मंत्री मंगेश बोभाटे, संरक्षण मंत्री दीपक लाकडे, व्यवस्थापन मंत्री भाग्यश्री बोभाटे, पाणीपुरवठा मंत्री/ राज्य स्पर्धा परीक्षा मंत्री सुरज गजभे, केंद्रीय स्पर्धा परीक्षा मंत्री विशाल ननावरे, कायदा मंत्री संदीप चन्ने, संदेशवहन मंत्री रीना वांढरे, युवक कल्याण मंत्री केशव गजभे, सांस्कृतिक कार्य मंत्री मेघा जांभुळे, सांस्कृतिक राज्यमंत्री स्वीती गजभे, नवोपक्रम मंत्री /शिक्षण मंत्री /अर्थ मंत्री/ग्रामविकास मंत्री वैभव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने