Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यात 297 कोरोनामुक्त, 122 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. June 09, 2021
चंद्रपूर:- 24 तासात जिल्ह्यात 297 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 122 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
बाधित आलेल्या 122 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 28, चंद्रपूर तालुका 7, बल्लारपूर 21, भद्रावती 9, ब्रम्हपुरी 2 , नागभिड 10, सिंदेवाही 4, मूल 8, सावली 6, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 6, राजूरा 2, चिमूर 3, वरोरा 6, कोरपना 5, जिवती 2 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 877 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 81 हजार 119 झाली आहे. सध्या 1 हजार 270 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 2 हजार 573 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 15 हजार 749 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 1488 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1377, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 40, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे