जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

अवैध सुगंधित तंबाखु विक्रेत्यांची माजी नगरसेवकास जिवे मारण्याची धमकी.

अप्पर पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील चंडिका वार्डातील अवैध सुगंधित तंबाखु विक्रेत्यांच्या घरी भद्रावती पोलिसांनी टाकलेल्या धाडिचा राग म्हणात धरून येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक शेख सत्तार शेख रसुल यांना त्यांचा घरात घुसुन त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार नुकताच घडला.
     
 दि. 3 जुन रोजी येथील चंडिका वार्डात भद्रावती पोलिसांनी साजिद शकिल शेख याचा घरी धाड टाकून 1 लाख 50 हजाराचा सुगंधित तंबाखु जप्त केला. तसेच साजिद याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शेख सत्तार यांनीच पोलिसांना माहिती देऊन धाड टाकायला लावली असा गैरसमज करून घेवून साजिद शेख याने आपल्या सोबत तिन साथीदारांना घेवून शेख सत्तार यांचा घरात घुसुन त्यांना अश्लील भाषेत शिविगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून पेट्रोल ओतून जाळून टाकण्याची धमकी दिली. या बाबत शेख सत्तार यांनी आपण पोलिसांना माहिती दिली नाही. असे सांगितले असता पोलिसांनीच तु माहिती दिल्याचे सांगितले असे म्हणून जर आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली तर  तुला जीवानिशी ठार मारू अशी धमकी शेख सत्तार यांना देण्यात आली. 
       याबाबत दुसर्या दिवशी शेख सत्तार हे  भद्रावती पोलस स्टेशन ला  तक्रार देण्याकरिता गेले असता. मोठे साहेब हजर नाही तुम्ही आता घरी जा आम्ही उद्या येतो आणि त्यांना समजावितो असे म्हणून पोलिसांनी शेख सत्तार यांचा बोलण्या कडे दुर्लक्ष केले. तसेच मारहाण करणारे लोक हे गुंडप्रव्रृतीचे असल्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या धमकीमुळे शेख सत्तार हे खुप घाबरलेले आहेत. 
       या संदर्भात शेख सत्तार यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दि.5 जुन रोजी एक निवेदन सादर करून साजिद शकिल शेख, शकिल वदुद शेख, शाकिर शकिल शेख आणि लतिफ वदुद शेख यांच्या वर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत