भाजयुमोचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांच्या नेतृत्वात विद्यापीठात ठिय्या.
महाविद्यालयांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही:- सोपान कनेरकर
अमरावती:- प्रवेश फी (प्रयोगशाळा, व्यायामशाळा, वाचनालय, डेव्हलपमेंट फी, सायकल स्टॅन्ड ) च्या पूर्णतः माफी साठी भाजयुमो चा दि 09 जुन ला भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांच्या नेतृत्वात भाजपा महानगर अध्यक्ष किरणभाऊ पातुरकर व भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता ताई दिघडे यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या प्रवेश द्वाराला कुलुप ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी सागर महल्ले भाजयुमो महामंत्री, अंकित जैन भाजयुमो महामंत्री, ऋषिकेश देशमुख, सचिन इंगळे जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो, वीरेंद्र लंगडे पंचायत समिती सदस्य, सचिन पाटील, कृणाल वेरूळकर आंदोलनात सहभागी होते.