💻

💻

नाल्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने 3 जण ठार.

तिघे सुखरूप बचावले.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
राजुरा:- शेती काम करून परत येत असताना नाल्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने 3 जणांना मृत्यू झाला, असून तीन सुखरूप बचावले.
राजुरा शहरा पासून 18 किलोमीटर अंतरावर देवाडा गावात मल्लेश शेंडे यांच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतीचे काम संपून राजू डामिलवार यांच्या मालकी चे ट्रॅक्टर वरून आपल्या घरी परत असताना अचानक पाऊस मुळे नाल्यात पाण्याचं फ्लो वाढल्याने ट्रॅक्टर नाल्यात वाहून गेले. ट्रॅक्टर नाल्यात पडल्याने मृतक माधुरी विनोद वंगणे वय 27, मलेश शेंडे वय 45, आणि लक्ष्मी विनोद वगने वय 7 यांचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाले. तर ट्रॅक्टर मालक राजू डामिलवार, बाधू कुमरे व बालवीर कोवे सुखरूप बचावले.
वृत लिहे पर्यंत माधुरी विनोद वंगणे व लक्ष्मी विनोद वगने यांचा मृतदेह सापडला तर मलेश शेंडे अद्याप लापता होते. या घटने मुळे देवाडा गाव सुन्न झाले असून एकाच घरचे आई व मुलगी मरण पावल्याने हळहळ व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत