हजरत टिपू सुल्तान फाउंडेशन राजुरा द्वारे रक्तदान व वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase
जागतिक रक्तदान दिन व हजरत टिपू सुल्तान फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष इंजी.अमजदभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. 


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दि. १४/०६/२०२१ रोजी असलेल्या जागतिक रक्तदान दिना निमित्य आज दि. १३/०६/२०२१ रोज रविवार ला हजरत टिपू सुल्तान फाउंडेशन राजुरा जिल्हा चंद्रपूर तर्फे रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे आज हजारो लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 मात्र आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्या रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्याचे आभार व्यक्त करण्यासाठी २००४ पासून जाक्तिक आरोग्य संघटना (WHO) ने १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करीत असते. भारतात २ हजार ७५० रक्तपेढय़ा आहेत, तर महाराष्ट्रात २८२ आणि नागपुरात १५ रक्तपेढय़ा आहेत. या माध्यमातून रक्तपुरवठा रुग्णांना रक्तपुरवठा केला जात असला तरी अजून बरीच आवश्यता आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन हजरत टिपू सुल्तान फाउंडेशन यांनी केले होते. या शिबीराला अनेक युवकाने उत्फुर्त प्रतिसाद दाखवला व शहरातील   प्रचंड संख्येत युवकानी रक्तदान केले. 
 
जागतिक रक्तदान दिनाच्या व फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष इंजी.अमजद भाई शेख यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राजुरा शहरतील सोफीशाह बाबा दर्गा हॉल मध्ये रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अमजद भाई शेख यांच्या हस्ते उद्घघाटन सोहळा पार पाडण्यात आला. कार्यक्रमचे आयोजन हजरत टिपू सुलतान फाऊंडेशन, राजुरा यांनी केले. प्रमुख उपस्थिती म्हणून निशात बेग, एजाज अहेमद, इर्शाद अहेमद शेख, फारुख शेख, सय्यद झाकीर, इर्शाद शेख(विहीरगाव), सुरज भंबारे, अलियान चाउस, मतीन कुरेशी, जुबेर आझाद(चंद्रपूर), आतिफ शेख(चंद्रपूर) आदी उपस्थित होते. रक्तदान सोबतच वृक्षारोपनाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला.
 
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष अस्लम चाऊस, अब्दुल शोऐब शेख, मो. नदीम, रियाज शेख, इंजी. शहबाज खान, जलाल बियाबानी, शानवाज कुरेशी, साबीर शेख, स्वप्नील रामटेके, साहिल शेख, सहकारी मित्र उपस्थित होते.