💻

💻

फ्रेंड्स चारीटी ग्रूप वतीने दिव्यांगला व्हील चेअर वाटप.(आधार न्यूज नेटवर्क राजुरा प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- माणूस म्हणून जन्माला आले आहे तर समाजाचे काही ऋण फेडण्यासाठी कार्य करावे या उत्तद हेतू समोर ठेऊन  फ्रेंड्स चारीटी क्लब चंद्रपूर हे नेहमी समाज कार्यसाठी समोर असतात.   
    राजुरा शहर पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठेबुरवाही गावात दिव्यांग संतोष हा छोट्या दुकान थाटून आपले कुटुंब चालवीत आहेत.  संतोष कुडसंगे  यांना दुकानात बसण्यासाठी व्हील चेअर नसल्याने खूप कष्ट सहन करावा लागत आहे अशी माहिती फ्रेंड्स चारीटी क्लब चंद्रपूर चे अध्यक्ष सरिता मालू आणि सय्यद जाकीर पत्रकार यांना माहिती मिळाली. लगेच  फ्रेंड्स चारीटी क्लब चंद्रपूर, अध्यक्ष सरिता मालू,  सय्यद  जाकीर पत्रकार तसेच प्रतिष्ठित व्यापारी यांच्या सहकार्याने दिव्यांगणा व्हील चेअर वाटप करण्यात आले. 
या प्रसंगी खुशी मालू, वेकटेश गड्डम, अनिश भाई, समरित, यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत