💻

💻

चिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन.

जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या जिल्हा निधीतून १० लक्ष रु.मंजूर.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथे जिल्हा निधीतून मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत ने मागणी केल्यानंतर दिलेला शब्द पुर्ण करत जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी जिल्हा निधीतून सदर रस्त्यासाठी १० लक्ष रु. मंजूर केले . संजय गजपुरे यांनी यासाठी जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांचे विशेष आभार मानले आहे.

    चिंधीचक या आदिवासी बहुल गावात ठक्कर बाप्पा योजनेतुनही निधी मंजूर करण्यात आला असुन त्यातुन पिण्याचे पाणी व विद्युत दिव्यांची सोय करण्यात येत आहे. चिंधीचक येथील स्मशानभूमी शेड व सौंदर्यीकरणासह गुरुमाऊली देवस्थानासमोरील सामाजिक सभागृहाचेही बांधकाम करुन जनतेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. नुकतेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थान इमारत नुतनीकरणाचे काम पुर्ण करून गाववासियांना दिलेल्या शब्दाची पुर्तता संजय गजपुरे यांनी केली आहे. चिंधीचक साठी विविध योजनेतून निधी उपलब्ध केल्याबद्दल सरपंच रविंद्र गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या वतीने जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे आभार मानले आहे.
     या भुमीपुजन प्रसंगी चिंधीचक चे सरपंच रविंद्र गायकवाड , उपसरपंच प्रदिप समर्थ, भाजपा तालुका महामंत्री जगदीश सडमाके , माजी उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य हरीजी वरठे , चिंधीचक चे ग्रामसेवक रतन वासे , ग्रा.पं.सदस्या सौ.विश्रांती सातपैसे , तेली समाजाचे अध्यक्ष विनोद नागोसे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत