Top News

शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी घडायला हवे - देवराव भोंगळे

शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणारे युवा समाजासाठी आदर्शच - ऍड. वामनराव चटप.

इंपिरियल क्लासेस चा उदघाटन सोहळा संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
 राजुरा:-  शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विदयार्थ्यांना नाविन्यपूर्ण टेक्निकल ज्ञान प्राप्त होत असते आणि या माध्यमातून विदयार्थी घडायला हवेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी क्लासेस च्या उदघाटन करते वेळी केले.
      आज दिनांक 13 जून ला राजुरा येथील सम्राट कॉम्प्लेक्स मध्ये इंपेरियल क्लासेस चा उदघाटन सोहळा पार पडला. स्वतःच शिक्षण पूर्ण करून आपल्या ज्ञानाचा फायदा इतर विद्यार्थ्यांना करून देणारे शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणारे युवा समाजासाठी खरे आदर्श आहे असे माजी आमदार तथा शेतकरी नेते ऍड वामनराव चटप बोलताना म्हणत होते.
      राजुरा शहरातील प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण घेता याव व शहराचा नाव लौकिक करता याव या उद्देशाने आज स्वप्नील पहानपटे द्वारा संचालित इंपेरियल क्लासेस चे उदघाटन झाले. या वेळी माजी आमदार ऍड वामनराव चटप, माजी जी.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अविनाश जाधव, प्रा. संभाजी वारकड, कुणाल चहारे, संतोष देरकर, रमेश नळे,राजकुमार डाखरे, सचिन भोयर, रुपेंद्र ढवस, समीर रासेकर, मयूर झाडे असिफ सय्यद, नीरज मत्ते, नीरज बोबडे, साहिल उईके, अंकित गिरसावळे, संकेत आस्वले उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने