🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पळसगाव येथे झालेल्या अपघातात "त्या" इसमाचे पाय ट्रकखालीचं आले.

पळसगाव येथे झालेल्या अपघातात "त्या" इसमाचे पाय ट्रकखालीचं आले.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सिंदेवाही:- तालुक्यातील पळसगाव जाट जवळील नाक्याजवळ आज (17 जून) सकाळी 8 वाजताच्या सुमारास नागपुरकडे चंद्रपुर मार्गे जाणारा सीमेंटने भरलेला ट्रक पलटी झाला. या झालेल्या भीषण अपघातात रस्त्याच्या कड़ेला सरपना करिता लाकडे गोळा करीत असलेला एक इसम जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की सीमेंटने भरलेला एक माल वाहक ट्रक क्र.MH - 34 BJ-5195 चंद्रपुर मार्गे जात होता पळसगाव जाट जवळील नाक्याजवळ ट्रक पलटी झाला त्याच ठिकाणी सरपना करिता एक इसम लाकडे गोळा करीत होता.
या अपघातात त्या इसमाचे पाय ट्रक खाली दबल्या गेले. जखमी इसमाचे नाव भोजराज लटारु माटे (65) असे आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच लगेच सिंदेवाहीचे ठाणेदार घारे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचुन जे सी बी च्या सहायाने जखमी माटे यांना बाहेर काढले व तात्काळ रुग्णवाहिका मध्ये जखमीवर ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्राथमिक उपचार करण्यात आले व पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे हलविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत