Click Here...👇👇👇

रोजगार हमी योजने अंतर्गत मामा तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन संपन्न.

Bhairav Diwase

🆘
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- आज दिनांक 03 जुन 2021 ला ग्राम पंचायत वाकल येथे म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मामा तलाव खोलीकरण च्या कामाचे भूमिपूजन राहुल सिद्धार्थ पंचभाई सरपंच ग्रा.पं.वाकल यांचे हस्ते करण्यात आले.

त्या प्रसंगी सोरते सर pto पं. स. सिंदेवाही दिनेश मांदाडे उपसरपंच वाकल राहुल चिमलवार सदस्य ग्रा.पं.वाकल, सविता कोकोडे सदस्य ग्रा. पं. वाकल नंदा भोयर सदस्य ग्रा.पं.वाकल मा.मंगला गावतुरे सदस्य ग्रा.पं.वाकल इत्यादी लोक उपस्थित होते.
त्याच प्रमाणे आरोग्य विभाग पं.स.सिंदेवाही व ग्रा.पं.वाकल यांचे विद्यमाने म.ग्रा.रो.ह.यो.च्या मजुरांचे अँटी जेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. सदर कॅम्प मध्ये एकूण 220 मजुरांची अँटी जण टेस्ट करण्यात आली. त्या प्रसंगी जगदाडे सर, तहसीलदार तह. कार्य. सिंदेवाही, धात्रक सर नायब तहसीलदार सिंदेवाही मा.चिडे सर आर. आय. सिंदेवाही मा.घाटोडे सर ए.बी.डी.ओ.सिंदेवाही, डॉ.मानकर सर एम.ओ.सिंदेवाही, नागोसे सर वि.अधिकारी आरोग्य मा.बारेकर ग्रामसेवक वाकल तसेच ग्राम पंचायत कमेटी यांचे उपस्थितीत सदर काम पार पडला
यशस्वीततेसाठी वामन कोकोडे ग्रा.प.कर्मचारी, रमेश मेश्राम रोजगार सेवक, जगदीश कोकोडे पा.पु.कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.