जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

पोंभूर्णा पंचायत समिती कार्यालयात "शिवस्वराज्य दिन" साजरा.

पोंभूर्णा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीमध्येही "शिवस्वराज दिन" उत्साहात साजरा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभूर्णा:- शिवस्वराज्य दिनानिमित्त पोंभूर्णा पंचायत समिती कार्यालयांमध्ये भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून , पुजन व त्यास नमन करून साजरा करण्यात आला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून शिवस्वराज दिन साजरा करण्याचा निर्णय राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने घेतला.
या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून पोंभूर्णा पंचायत समिती कार्यालयात कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पंचायत समीतीच्या सभापती अलका आत्राम , गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोले गटशिक्षणाधिकारी सोनकुरे , कार्यालयीन‌अधिक्षीक रश्मी पुरी, व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
तसेच पोंभूर्णा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीमध्येही शिवस्वराज दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत