💻

💻

भद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा.

भाजयुमोची जिल्हाधिऱ्यांकडे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.  
     रिक्त पदांमुळे येथील तहसील कार्यालयामार्फत होत असलेली तालुक्यातील महत्वाची कामे रखडलेली आहे. सध्याच्या स्थितीत भद्रावती तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार-१, निवडणूक नायब तहसीलदार-१, संजय गांधी निराधार योजना नायब तहसिलदार-१, अव्वल कारकून-३, कनिष्ठ लिपिक-३, व शिपाई-४ असे तेरा पदे रीक्त असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामांचा तान येऊन नागरिकांची कामे रखडत आहे.पुढे शैक्षणिक सत्र सुरू होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, इतर दस्तऐवजांची गरज पडत असते. कर्मचारी कमी असल्यामुळे याचा त्रास नागरिक व विद्यार्थांच्या कामावर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वरील पदे त्वरित भरायची मागणी करण्यात आली आहे.
      सदर निवेदन सादर करतांना भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, अमित गुंडावार, तैसीफ शेख, सचिन कौरासे, युगेश खोब्रागडे, अमर महाकुलकर आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत