💻

💻

चंद्रपूरच्या दारुबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठात कॅवेट दाखल.

येत्या आठ ते दहा दिवसात दारु विक्रीची दुकान सुरु होण्याची शक्यता?
Bhairav Diwase.         June 12, 2021

चंद्रपूर:- राज्य शासनाने अधिसूचना जारी करून परवाना नुतणीकरणाचे निर्देश दिल्यानंतर दारूबंदी उठविण्याच्या निर्णय शासन मागे घेणार नाही, हे स्पष्ट झाले. येत्या आठ ते दहा दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील दारुविक्रीचे दुकान सुरु हाेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:- चंद्रपूर जिल्ह्यातील दारू परवाना नुतनीकरणाची निघाली अधिसूचना. 
https://www.adharnewsnetwork.com/2021/06/chandrapur_8.html

दारुबंदी उठविण्याच्या निर्णयाविराेधात कुणी न्यायालयात गेले तर आपली बाजू ऐकुन घ्यावी, यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या राज्यातील मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठीत कॅवेट दाखल केले आहे. एक एप्रिल २०१५ राेजी जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू झाली. २७ मे २०२१ राेजी दारुबंदी उठविण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रींमंडळाने घेतला. दारुबंदी हटविण्याच्या निर्णयाला राज्यभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विराेध केला आहे.

हेही वाचा:- चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा मंत्रिमंडळात निर्णय. 

https://www.adharnewsnetwork.com/2021/05/embargo-in-chandrapur-was-lifted.html


८ जुन २०२१ राेजी गृह विभागाने अधिसूचना काढून परवाने नुतणीकरणाचे आदेश दिले आहे. अधिसूचनेनंतर दारुविक्रीच्या परवान्यांचे नुतणीकरणाचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ ते दहा दिवसात दारु विक्रीची दुकान सुरु हाेवू शकते, असे सुत्रांचे म्हणणे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देशी दारु (किरकाेळ विक्री)९८, बिअर शाॅपी ५०, बार अन्ड रेस्टारंटचे ३१४, आणि क्लबचे दाेन परवाने नुतणीकरणासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. वाॅईन शाॅपचे आधी २४ परवाने हाेते.

आता केवळ ५ वाॅईन शाॅपचे परवाने जिल्ह्यात आहे. नुतणीकरणासाठी २०२०-२०२१ या वर्षांचे शुल्क आकारले जाणार आहे. यातून दाेन ते अडीच काेटींचा महसूल शासनाला मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत