💻

💻

अनियंत्रित होऊन रुग्णवाहिका उलटली; चालक जखमी. Accident

बल्लारपूर- गोंडपिपरी मार्गावर आक्सापुर गावाजवळील घटना.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिंपरी तालुक्यातील आक्सापूर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयाची ही रुग्णवाहिका चंद्रपूरहून परत जात असताना वाटेत दोन गाई आडव्या आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती उलटली. या दोन्ही गाईंवर आदळून ती उलटून पडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही रुग्णवाहिका रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला. कोठारी पोलिस ठाण्याचे ठाणेदार तुषार चौहान हे चौकशी करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत