प्रियकराने प्रियसीला वाढदिवशी गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात घेऊन गेला अन्......

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर: प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरात घडली आहे. आरोपीने व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे बोलले जात आहे. बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेनं पोलीसांत तक्रार केल्याचे दिसून येते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या असून त्याची चौकशी केली जात आहे.
संबंधित आरोपी प्रियकराचं नाव सन्मुखसिंग बुंदेल असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील रहिवासी आहे. याच शहरात राहणाऱ्या आपल्या प्रेयसीसोबत आरोपीने हे गैरकृत्य केलं आहे.
संबंधित घटना शुक्रवारी (4 जून रोजी) घडली असून याप्रकरणी सायबर पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केल्यानंतर आरोपी प्रियकर सन्मुखसिंग बुंदेलला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.