💻

💻

गावात थोर समाजसुधारकांचे स्मारक बांधा.

साखरवाही येथील गावकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- गावातील जुन्या ग्रामपंचायतीच्या जागेवर थोर समाजसुधारक छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, विर बापूराव शेडमाके, व अहिल्याबाई होळकर यांचे संयुक्त स्मारक बांधावे अशी मागणी सचिवाला दिलेल्या एका निवेदनाद्वारे गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी गावकऱ्यातर्फे केली आहे.
   या थोर पुरुषांनी समाजासाठी  आपले जिवन वाहून समाजातील विविध  वर्गाचे जीवन जगने सुसह्य केले आहे. हे महापुरुष भावी पिढींचे दिपस्तंभ आहेत. त्यामुळे गावातील भावी पिढींना प्रेरणा मिळावी यासाठी गावात या थोर पुरुषांचे संयुक्त स्मारक होणे गरजेचे असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.
निवेदन सादर करतांना साखरवाही ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद खापणे, प्रिया ढवस, किर्ती कडूकर, भाऊराव कुळमेथे,व  आशिष वाढई आदी गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत