Top News

ब्रम्हपुरी येथे श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार ऑक्सिजन बँक" सुरू.

माजी आमदार अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली भा.ज.यु.मो चा उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी प्रशासनाने धोका कायम असल्याचे सांगितले आहे. या व्यतिरिक्त कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या परिस्थितीचा सामना करण्याकरीता व नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरीच्या वतीने "श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार ऑक्सिजन बँक" सुरू करण्यात आली आहे. माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडून प्राप्त झालेले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी भा.ज.यु.मो ब्रह्मपुरीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करीत या उपक्रमाचा शुभारंभ केला.
या प्रसंगी भाजपा शहर कोषाध्यक्ष अरविंद नंदूकर, भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, भा.ज.यु.मो शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवें, शहर सचिव दत्ता येरावार, ओबीसी आघाडीचे शहर अध्यक्ष पंकज माकोडे, अमित रोकडे उपस्थित होते.
"श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार ऑक्सिजन बँक" च्या माध्यमातून घरीच उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी आहे अशा रुग्णांना निशुल्क ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बँकेत एक bipap मशीन सुद्धा उपलब्ध असणार आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार bipap मशीन रुग्णाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संपर्क करून या सेवेचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे.
या प्रसंगी ब्रम्हपुरी येथील नागरिकांच्या सुविधेसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने माजी मंत्री आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार ऑक्सिजन बँकेचा अनेक गरीब रुग्णांना निश्चितच फायदा होणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचा हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने