मिसाबंदीत अटक झालेले अविनाश नेवासकर यांचा वरोरा भाजपच्या वतीने सत्कार.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- मिसाबंदीत अटक झालेले वरोरा निवासी अविनाश नेवासकर यांचा वरोरा भाजपच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
माजी पंतप्रधान दिवंगत इंदीरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशावर आणीबाणी लादली. या कालावधीत दडपशाही नितीचा अवलंब करून देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बाधा आणली गेली होती. या आणीबाणीचा विरोध करणा-या नागरिकांना तुरूंगात टाकले. त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी 25 जून हा काळा दिवस म्हणून संपूर्ण भारतात भाजपा च्या वतिने पाळण्यात येतो.
या दिवसाचे औचित्य साधून वरोरा येथील वास्तव्यास असणारे श्री. अविनाश नेवासकर गुरूजी यांचा वरोरा भाजपच्या वतीने शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. श्री. नेवासकर हे आणीबाणीच्या काळात 19 महीने तुरूंगात होते.
याप्रसंगी डाॅ. अंकुश आगलावे यांनी आणीबाणी लादणे म्हणजे भारतीय संविधानाने दिलेले विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बाधाच होय असे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या निवासस्थानी वरोरा न.प. चे अध्यक्ष अहतेशामजी अली, डाॅ भगवान गायकवाड, बाबा भागडे, सुरेश महाजन, अनिल साखरीया, अमित चवले, कादर शेख, अमित आसेकर, प्रकाश दुर्गपुरोहित, पंढरी वरभे, राजेश सकोरे , ओम यादव इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.