माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत "मन की बात" चा कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार आज दि.27.06.2021 रोज शनिवार ला 11.00 वा. चुनाळा ता. राजुरा येथे बूथस्तरीय कार्यकर्ते व नागरिकांना देशाचे पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी यांच्या 78 व्या "मण की बात" या कार्यक्रमाचे प्रसारण दाखविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर होते, प्रमुख उपस्थिती भाजप चे जिल्हा सचिव तथा ग्रा. पं. खमोना चे सरपंच हरिदास झाडे, चुनाळा ग्रा. पं. सरपंच बाळू वडस्कर, ग्रा. पं. माजी सरपंच संजय पावडे, भाजप चे कार्यकर्ते नितीन बाम्बरटकर व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप चे शक्तिकेंद्र प्रमुख तथा ग्रा.पं. चुनाळा चे सरपंच बाळू वडस्कर यांनी केले.मन या कार्यक्रमानिमित्त आमदार सुदर्शन निमकर यांनी मा. पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाबद्धल विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमाला कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहिल्या बध्दल बाळू वडस्कर यांनी त्यांचे आभार मानले.