Top News

पाहणारे डोळे आणि मदतिचे हात संस्थेकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.

🆘
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पाहणारे डोळे आणि मदतीचे हात संस्थेकडून पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ होत आहे वाढत्या प्रदुषणामुळे दिवसेन दिवस ऑक्सिजनचा स्तर कमी होत असलेला आपल्याला दिसून येत आहे. कोरना सारखे महा भयंकर आजार झाले तर आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे ऐवढी खराब परिस्तिथी आज निर्माण झालेली आहे.या परिस्तिथी मात करून समोर जाण्यासाठी आपल्या सर्वांना वृक्षारोपण करणे तेवढेच गरजेचे आहे , हे लक्षात घेता पाहणारे डोळे आणि मदतिचे हात या संस्थेच्या युवकांनी समोर येत गावातील काही परिसरात वृक्षारोपण केले व हि वृक्ष लावून त्यांचा संगोपन करण्याचा निर्धार या संस्थेच्या युवकांनी घेतला.
🆘
🆘
या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सरपंच सौ. ठामेश्वरी लेनगुरे , उपसरपंच मंगेश उपरे, विशेष सहकार्य वनरक्षक श्री. रवी बत्तलवार , जिजाऊ ग्रामसंघाचे अधक्ष सौ पौर्णिमा विनोद कुमरे, सचिव रंजिता मनोज उपरे, कोषाअधक्ष सौ सविता मिलींद लेनगूरे व आय सीआरपी सौ सुनिता प्रफूल शेंडे, सीटीसी मनीषा अनिल थेरे, अंगणवाडी सेविका आम्रपाली उपरे व पाहणारे डोळे आणि मदतीचे हात संस्थेचे निखिल झबाडे, अंकुश उराडे, निखिल झूरमुरे, चंद्रकांत सिडाम,संदीप यम्पलवार, भीमराव मेश्राम, विक्रम लेनगुरे, नदिम कुंभरे, मनोज उपरे, अविनाश लेनगुरे, मनिष ठाकरे, अमित कुंभरे,अंकुश लेनगुरे, चेतन कावळे, महेश कुलमेथे यांचा मोलचा सहभाग लाभला. 🆘

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने