जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर छत्तीसगडी युवकांचा सामूहिक बलात्कार.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- धानोरा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर छत्तीसगडमधील चार युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना २८ मे रोजी रात्री घडली. बुधवारी ही घटना समोर आली. दरम्यान त्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांचा पीसीआर मिळविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील एका गावात एका कार्यक्रमाकरिता हे चार युवक आले होते. त्याच कार्यक्रमात सदर अल्पवयीन मुलगीही गेली होती. त्या चार युवकांनी सदर युवतीला कार्यक्रमातून गावालगतच्या जंगलात नेले. एका युवकाने तिला पकडून ठेवून तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर तेथून पोबारा केला.
दुसऱ्या दिवशी मुलीच्या पालकांना याबाबत कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन त्या चारही युवकांना १ जून रोजी त्यांच्या गावातून ताब्यात घेतले. गडचिरोली येथील सत्र न्यायालयाने चारही आरोपींना सात दिवसांचा पीसीआर दिला. सदर मुलीवर गडचिरोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अंजली राजपूत करीत आहेत.