धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण कोर्टातून मिळेल.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- भारतीय संविधानाने दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण धनगर जमातीला कोर्टातूनच मिळेल. आजपर्यंत राजकीय पक्षांनी भूलथापा देऊन आपल्याला फसविले परंतु आता धनगर फसणार नाही तर हक्काची लढाई न्याय मिळे पर्यंत सुरूच ठेवेल असे प्रतिपादन प्रबोधन मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष कैलास उराडे यांनी केले. राजुरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
काल संपूर्ण महाराष्ट्रात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोविड नियम पाळून उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर जमात मंडळ राजुरा च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात २९६ वी जयंती मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडली. जयंतीच्या निमित्ताने पुंडलिक उराडे यांनी घेतलेल्या स्पर्धा निकाल घोषित करण्यात आला व विजेत्यांना संध्या ढवळे, गणपत बोधे, गोपाळ बुरांडे, बळीराम खुजे, रुपेश चीडे, विठोबा तेलंग यांच्या हस्ते द्रौपदी पोतले, ज्योती गोंडे, वनिता उराडे, सचिन झाडे, प्रणाली तुराळे, दर्शना पोतले, सुनीता कोरडे यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी मान्यवरांनी अहिल्यादेवीचा इतिहास आणि कार्य आदर्श असल्याचे सांगून समाजाने आता मानसिक आणि राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन धनंजय डवरे यांनी केले तर सर्वांचे आभार बंडू पोतले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश पोतले, दशरथ धवणे, मधुकर गाडगे, रामदास दवंडे यांनी परिश्रम घेतले.