Click Here...👇👇👇

राज्य बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याविषयी कॅबिनेटमध्ये चर्चा.

Bhairav Diwase
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शिक्षण विभागाचा प्रस्ताव.
Bhairav Diwase. June 02, 2021
मुंबई:- राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बारावीच्या परीक्षा संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. आज 12 च्या परीक्षा संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द होण्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून मिळाले आहेत. कोविड परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याची मागणी केंद्राकडे केल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बारावीच्या परीक्षा संदर्भात आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे.

आजच्या बैठकीत 12 वीच्या परीक्षेसंदर्भात चर्चा झाली. 12 वीची परीक्षा मे एंडपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता कोविडच्या प्रभावामुळं 12 वीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाली. आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यानंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत, असं गायकवाड म्हणाल्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर याआधीच राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
सीबीएसई पाठोपाठ काल आयएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. निकाल कसा लावणार याबाबत निर्णय लवकरच होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हटलं. सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे.
आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान मोदींनी काल म्हटलं होतं.