महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे स्व. संजय देवतळे यांना श्रद्धांजली. Rip

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. संजय देवतळे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे नुकतीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कोविड नियमांचे पालन करुन येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ विभागाचे अध्यक्ष प्रा. महेश पानसे होते. प्रमुख अतिथी म्हणून वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष अहेतेशाम अली, युवा नेते करण देवतळे, माजी नगरसेवक अफझलभाई, सामाजिक कार्यकर्ते विनायक गरमडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भद्रावती तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे, खैरे कुणबी समाजाचे भद्रावती तालुका अध्यक्ष हनुमान घोटेकर, सचिव आत्माराम देशमुख प्रभृती मंचावर उपस्थित होते.
       सर्वप्रथम वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते स्व. संजय देवतळे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. तसेच यावेळी १ मिनिट मौन पाळून सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. अहेतेशाम अली, अफझलभाई, करण देवतळे, विनायक गरमडे, आत्माराम देशमुख आणि पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील पतरंगे यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणातून स्व. संजय देवतळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्व. संजय देवतळे यांच्या रुपाने एक सेवाभावी व सुसंस्कारी नेता हरपल्याची भावना व्यक्त केली.
      स्व. संजय देवतळे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे औचित्य साधून आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून येथील पेट्रोल पंपवर काम करणा-या कर्मचा-यांना फेस शिल्ड व मास्क चे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन म.रा. मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे यांनी केले.कार्यक्रमाला म.रा. मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.